शहरातील लहान व्यवसायिकांना चालना देण्यासाठी आणि ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक लोखंडी शटर असलेले नवीन स्टॉल्स बांधण्यात आले
घनकचरा व्यवस्थापन सुधारणा
स्वच्छतेबाबत शालेय स्तरावर शिक्षण
जनजागृतीद्वारे स्वच्छतेचे महत्व वाढवणे
ग्रामीण भागात शौचालयांची उभारणी
👩 लाडकी बहिण योजना
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा गरीब घरातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे.
तुमचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असले पाहिजे.
जर तुम्ही महाराष्ट्राची रहिवासी नसाल, तर ही लाडकी बहिन योजना तुमच्यासाठी नाही.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना दरवर्षी किमान १०० दिवसांचा मजुरीवर आधारित रोजगार देण्याची कायदेशीर हमी दिली जाते.
ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे
ग्रामीण गरीब कुटुंबांना उत्पन्नाचा आधार देणे
रस्ते, पाणी साठवण, शेततळी, वृक्षारोपण यांसारखी शाश्वत मालमत्ता (assets) निर्माण करणे
ग्रामपातळीवर आर्थिक विकासाला चालना देणे
प्रधानमंत्री आवास योजना
ही सरकारची एक मोठी योजना आहे ज्याचा उद्देश गरजू, गरीबी रेषेवरील किंवा कम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना “पक्कं, सुरक्षित घर ” पुरवणे हा आहे.
ज्यांचे घर पक्के नाही, किंवा जुने, तुटले-भंग झालेले घर आहे.
शहरी योजनेत (PMAY-U) काही वेळा गृहकर्जावर व्याज सबसिडी किंवा अनुदान मिळू शकते.
जलस्वराज योजना
ही महाराष्ट्र सरकारची लोकसहभागावर आधारित ग्रामीण जलव्यवस्थापनाची योजना आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पाण्याचे संवर्धन, पाणीपुरवठा व्यवस्थेची देखभाल व गावांच्या पाणी स्वावलंबन वाढवणे हा आहे.
ग्रामीण भागात शाश्वत पाणी व्यवस्थापनाची निर्मिती
पाण्याचे संवर्धन, साठवण, पाईपलाइनद्वारे पाणीपुरवठा